Sunday, June 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुडाळ येथे होणार जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

कुडाळ येथे होणार जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांचे आयोजन

 

कुडाळ | प्रतिनिधी 

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने कुडाळ येथील एस एन देसाई चौक येथे १ मार्च रोजी सायं. ६ वाजता जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) मागील सात वर्षे विविध आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मधे सर्व प्रोफेशनल, उद्योजक, व्यवसाय,नोकरी करणारे मित्र परिवारास जोडण्याचे काम संस्थापक धीरज परब यांनी केले असून यातून अविरतपणे सात वर्षे विविध सामाजिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या करत आहे. ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा. याकरिता यावर्षी म्हणजे आठव्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 ही स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन मान्यतेने संपन्न होणार आहे. 

महाविजेता स्वस्तिक श्री ३० हजार रुपये, चषक, किताब, बेस्ट पोझर ५ हजार रुपये, मोस्ट इमप्रोव्हेड ५ हजार रुपये, स्पर्धा पाच गटांमध्ये होणार असून 0KG – 55KG, 55 KG – 60 KG, 60KG – 65KG, 65KG-70kG आणि 70+KG प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांक 3 हजार 555 व चषक, द्वितीय क्रमांक 3 हजार 111 व चषक, तृतीय क्रमांक 2 हजार 555 व चषक, चतुर्थ क्रमांक 2 हजार 111 व मेडल, पाचवा क्रमांक 1 हजार 555 व मेडल, सहावा क्रमांक 1 हजार 111 व मेडल अशी बक्षिसे आहेत.

 

मेन्स फिजिक्स स्पर्धा

प्रथम ५ हजार रुपये व चषक, व्दितीय ४ हजार रुपये व चषक, तृतीय ३ हजार रुपये व चषक, चतुर्थ २ हजार रुपये व चषक, पाचवा १ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत. अधिक माहितीसाठी 9422596375 येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!