ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये शिवसेना पक्षातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा शिवसेना जिल्हा परिषद सदस्य, सिंधुदुर्ग गट स्थापन करण्यात आला. या गटाच्या गटनेते पदी घावनळे ३२चे सदस्य श्री केशव रमेश नारकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
कुडाळ- मालवण मतदार संघाचे शिवसेना आमदार निलेशजी राणे यांच्या आदेशाने व दत्ताजी सामंत यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना पक्षातून निवडून आलेले केशव नारकर , तुकाराम साईल, नागेश आईर, रुपेश कानडे, संतोष साठविलकर, सुदन कवठणकर, साक्षी तळवडेकर, यज्ञा साळगावकर, दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे, वर्षा सांबारी, सोनाली घाडीगावकर, अक्षता गावडे, रोहिता तांबे यांनी एकत्र येत शिवसेना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नावाचा अधिकृत गट स्थापन केला.
यासंदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी पत्र देण्यात आले असून गट स्थापन करणे बाबत ठराव व त्याबद्दलचे इतिवृत्त सादर करण्यात आले. शिवसेना जिल्हा परिषद सदस्य,सिंधुदुर्ग गटनेते पदी श्री केशव नारकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने गट स्थापन केल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महाराष्ट्र प्राधिकरण व संबंधित नियमानुसार या गटाची अधिकृत नोंद घेण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली.


