Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणमाणुसकीचे दर्शन: महामार्गावर पडलेले पाकीट शोधून सावळाराम अणावकर आणि बाळा गावडे यांनी...

माणुसकीचे दर्शन: महामार्गावर पडलेले पाकीट शोधून सावळाराम अणावकर आणि बाळा गावडे यांनी दाखवला प्रामाणिकपणा

कुडाळ | प्रतिनिधी

धावपळीच्या युगात जिथे माणूस माणसाला विसरत चालला आहे, तिथे सावळाराम अणावकर आणि बाळा गावडेयानी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे एका कष्टकरी युवकाचे पडलेले दहाहजार तीनशे रुपये आणि महत्त्वाचे दस्तऐवज सुखरूप परत मिळाले आहेत. वेताळबांबार्डे येथे घडलेल्या या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*नेमकी घटना काय?*

मिळालेल्या माहितीनुसार, कट्टा-गुरामवाडी येथील विनीत देऊलकर हा युवक आपल्या दुचाकीवरून महामार्गावरून जात असताना, वेताळबांबार्डे येथे त्याचे पाकीट खिशातून निसटून पडले. पाकिटातील रोख रक्कम रस्त्यावर विखुरली गेली, मात्र विनीतला याचा पत्ता नसल्याने तो तसाच पुढे निघून गेला.

त्याच वेळी त्या मार्गावरून शिक्षक नेते तथा राष्ट्रवादी (अजित पवार गट) सरचिटणीस सावळाराम अणावकर आणि बाळा गावडे हे प्रवास करत होते. रस्त्यावर पाकीट आणि पैसे पडलेले पाहताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवली. त्यांनी रस्त्यावर विखुरलेले सर्व पैसे गोळा केले आणि पाकीट ताब्यात घेतले.

*असा लागला मालकाचा शोध*

पाकीट उघडल्यानंतर त्यात विनीत देऊलकर याचे आधार कार्ड सापडले. आधार कार्डवरील पत्त्यावरून तो कट्टा येथील असल्याचे समजले. अणावकर यांनी तातडीने कुडाळचे व्यावसायिक देवेन शिरसाट यांच्याशी संपर्क साधला. शिरसाट यांनीआपले मित्र कट्टा येथील व्यावसायिक संजय कुडाळकर यांना फोन करून संबंधित युवकाचा शोध घेण्यास सांगितले.

काही वेळातच विनीत देऊलकर यांच्यापर्यंत निरोप पोहोचला. आपले पाकीट हरवल्याचे समजताच विनीतने कुडाळ गाठले. आपली ओळख पटवल्यानंतर, सावळाराम अणावकर आणि बाळा गावडेयांनी ते पाकीट आणि त्यातील सर्व रक्कम विनीतच्या स्वाधीन केली.

*युवक झाला भावूक*

विनीत देऊलकर हा इलेक्ट्रिकलचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. कष्टाचे पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे परत मिळाल्याने तो भावूक झाला. “आजच्या काळात असा प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला आहे,” अशा भावना व्यक्त करत त्याने सावळाराम अणावकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!