कुडाळ,12
कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष पी. डी. शिरसाट, उपाध्यक्ष संदेश पडते, सचिव महेश ओटवणेकर, खजिनदार अक्षय सावंत यांनी कुडाळ शहरातील २६ बँकांना प्रत्यक्ष भेट देऊन सुट्या पैशांची उपलब्धता त्वरित करून मिळणेबाबत निवेदन दिले.
सर्व बँकांनी सुटे पैसे उपलब्ध करून देण्याबद्दल सहकार्य करू असे सांगितले विशेषता स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंधुदुर्ग बँक, एचडीएफसी बँक, यांनी सुट्या पैशांची व्यवस्था लवकरात लवकर करून देण्याची हमी अध्यक्ष पी.डी. शिरसाट व पदाधिकाऱ्यांना दिली. प्रत्यक्ष भेटीदरम्यान संघटनेला सर्व बँकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल बँकांचे व्यापारी संघटनेतर्फे धन्यवाद.


