सिंधुदुर्ग जिल्यातील तरुणांस जर्मनी मधून आसाम सरकारचे निमंत्रण..
कसाल 4एप्रिल
मेघराज मधुकर कसालकर कुडाळ तालुक्यातील कसाल देऊळवाडी येथील तरुणाची अभिमानास्पद कामगिरी
जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत त्यातील एक म्हणजे ऊर्जा. एका तरुणाने याच विषयाचे गांभीर्य ओळखून मुंबई मधील विलेपार्ले स्थित मुकेश पटेल इंजिनीरिंग युनिव्हर्सिटी मध्ये इंजिनीरिंग ची पदवी मिळविली. आणि मास्टर इन इंटरनॅशनल Renuable एनर्जी साठी जर्मनी मधील बायर्ण राज्यातील आंबेर्ग या शहरातील OTH वायडन युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळविला. कसालकर कुटुंब मूळचे कुडाळ तालुक्यातील कसाल गावचे असल्याने घरात मालवणी भाषा शिक्षण इंग्लिश मधून आणि मातृभाषा मराठी जर्मनी मध्ये प्रवेश मिळविण्या ची पहिली अट जर्मन भाषा मुंबई मध्ये कोणताही ट्युशन क्लासस नजाता जर्मन भाषा शिकून नामवंत युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळविला आणि मास्टर इन इंटरनॅशनल Renuable एनर्जी या क्षेत्रात पदवी प्राप्त केली. भारता बरोबरच जगातील उच्च शिक्षण घेणाऱ्या असंख्य मुलांना शिक्षणचे महत्व आणि येणाऱ्या अडचणी यावर मात करता यावी यासाठी यूट्यूबवर एडुकेशन चॅनेल सुरु केले आणि असंख्य मुलांना प्रवेश घेण्यास मदत केली. जर्मन भाषा प्रभुत्व आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना मदत करण्याच्या या कार्याची युनिव्हर्सिटी ने दखल घेत युनिव्हर्सिटी चा ब्रँड ambyaseater म्हणून घोषणा केली. जर्मनी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती मिळतात त्या सर्व शिष्यवृत्ती देण्याऱ्या कंपनीचा रोल मॉडेल म्हणून सन्मान करण्यात आला. आसाम सरकार शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे आमूलाग्र बदल घडवत आहे आणि परदेशात देण्यात येणारी शिक्षण पद्धती आसाम मध्ये लागू करणार आहे. आसाम सरकारचे शिक्षण विषयक शिष्टमंडळ जर्मनी मध्ये गेले असता जर्मन युनिव्हर्सिटी च्या ऑथॉरिटीने कुमार मेघराज कसालकरची या शिष्टमंडळात नियुती केली.
आसाम सरकारचे IAS ऑफिसर नारायण कोंवर आसाम शासनाचे उच्च शिक्षण विभागाचे आयुक्त व सचिव तसेच RUSA / PM-USHA, आसामचे मिशन संचालक यांनी मेघराजचे हे कार्य बघून आसाम मधील गुहावटी येथे होणाऱ्या शिक्षण विषयक संमेलन साठी आसाम सरकारच्या वतीने दिनांक 29 जानेवारीला ते 31 जानेवारीला होणाऱ्या या संमेल्लन साठी आणि आसाम मधील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या मुलांना मार्गदर्शन देण्यासाठी विशेष निमंत्रण दिले. शिक्षण कोणतेही असो त्याचा योग्य उपयोग आपल्या देशासाठी करता येईल यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मेघराज कसालकर या कार्यामुळे भारत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान आज अभिमानाने उंच झाली आहे.


