Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकसाल येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप*

कसाल येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप*

नवी मुंबईचे नगरसेवक किशोर पाटकर यांच्या विश्वस्त संस्थेच्या उपक्रम

कसाल, 2 एप्रिल

कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कसाल हायस्कुलच्या शंभर गरजू विद्यार्थी -विद्यार्थिनींना आज शिंदे सेनेचे कुडाळ -मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.

             शिंदे सेनेचे नवी मुंबईचे पदाधिकारी आणि नगरसेवक किशोर पाटकर यांच्या विश्वस्त संस्थेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थी -विद्यार्थिनींना सायकली भेट देण्यात येतात.मात्र एवढं असूनही पाटकर हे स्वतः किंवा त्यांच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांपैकी अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित रहात नाहीत.आजच्या या सायकल वाटपाच्या कार्यक्रमालाही यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.

             आमदार निलेश राणे यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलतांना या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करुन पाटकर यांच्या दानशूर पणाचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.खासदार असताना आपण यापूर्वी शाळेला मदत केली होती व यावेळी आयोजित कार्यक्रमाला आपण आपल्या मातोश्रींसह उपस्थित होतो याची आठवण करून देत यापुढे संस्थेला, शाळेला जी जी मदत लागेल ती आपण निश्चितपणे करू असे राणे यांनी यावेळी जाहीर केले.संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

   शाळेचे मुख्याध्यापक उत्तम माळगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या वाटचालीची माहिती सांगितली. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष भाई सावंत,विश्वस्त अवधूत मालणकर, सचिव जि. प. चे उपाध्यक्ष दादा साईल, जि. प. सदस्या दीपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, शालेय समिती अध्यक्ष नवीन बांदेकर,कसाल सरपंच राजन परब, उप -सरपंच शंकरपरब, जि. प. चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते आदी उपस्थित होते.आमदार राणे यांचे आगमन होताच ज्या शंभर विद्यार्थी -विद्यार्थिनींना सायकल देण्यात येणार होती त्या सर्वांनी फुलांचे गुच्छ तयार करून आणले होते. या सर्वांनी राणे यांचे स्वागत केले.कार्यक्रमाच्या शेवटी राणे यांनी सर्व शंभर जणांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!