Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणसाहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सणच..!!

साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सणच..!!

कुडाळ | प्रतिनिधी

साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सणच असतो. आमच्या कुटुंबासोबत कार्यकर्ते सुद्धा हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात हे आमच्यासाठी प्रोत्साहन आणि जबाबदारी आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे भाजप आयोजित कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. 

भाजपच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरराज्यस्तरीय कॅरम स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते ही स्पर्धा कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, महिला संघटक संध्या तेरसे, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, नागेश आईर, आरती पाटील, रुपेश कानडे, भाई सावंत, छोटू पारकर, कॅरम असोसिएशनचे ॲड. सुधीर भणगे, सुनील धुरी, बंड्या सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की भाजप असो किंवा शिवसेना यामधील सगळे कार्यकर्ते आमच्या कुटुंबातीलच आहेत साहेबांचा वाढदिवस सर्वांसाठीच सणासारखा असतो आम्हा कुटुंबीयांना हा दिवस सर्वात महत्त्वाचा वाटतो आणि तो आम्ही उत्साहाने साजरा करतो साहेबांचा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्ते सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करतात जिल्हाभर कार्यक्रम सुरू आहेत हे साहेबांनी मिळवलेले प्रेम आहे आम्हाला त्यांचा अभिमान आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्या तवटे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!