Thursday, July 30, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठक आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

कुडाळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठक आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

यापुढे असे आराखडे करा की भविष्यात पाणीटंचाई हा शब्द सुद्धा या ठिकाणी वापरला जाणार नाही – आमदार निलेश राणे

 

कुडाळ | प्रतिनिधी 

पाणी टंचाईचे आराखडे नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये बनवून ते प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवा म्हणजे ती कामे मे महिन्यापर्यंत होतील आणि टंचाई दूर होईल असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्याच्या पाणी टंचाई आढावा बैठकीत सांगून यापुढे असे आराखडे करा की भविष्यात पाणीटंचाई हा शब्द सुद्धा या ठिकाणी वापरला जाणार नाही असे सांगितले तसेच यावर्षी जून पर्यंत आराखड्यातील सगळी कामे पूर्ण करा असेही निर्देश दिले. 

कुडाळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठक आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली­ पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये संपन्न झाली यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, तहसीलदार सचिन पाटील, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, गटविकास अधिकारी मनोज भोगटे, ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता दीपक गवस तसेच अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

यावेळी पाणीटंचाईचा आढावा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक गवस यांनी दिला त्यांनी सांगितले की यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा हा ५९ लाखाचा असून त्यामधील नळ पाणी योजनेतील सात कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे तर बोरवेलच्या कामांना मंजुरी मिळणार आहे यामधील नळ पाणी योजनेसाठी ४१ लाख तर बोरवेल च्या कामासाठी १८ लाख मंजूर झाले आहेत जून पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश आहेत असे सांगून जानेवारी मध्ये आराखडे घेण्यात आले होते या आराखड्यांना फेब्रुवारीमध्ये मंजुरी देण्यात आले मात्र प्रशासकीय मंजुरी आता मिळाल्यामुळे कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत अशी माहिती दिल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी सांगितले की जून महिन्यामध्ये पाणी टंचाईची सगळी कामे पूर्ण झाली पाहिजेत जून महिना आला म्हणून हि कामे रद्द झाली किंवा करता येणार नाहीत हे ऐकून घेतले जाणार नाही. असे सांगून हे पाणीटंचाईचे आराखडे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण झाले पाहिजे म्हणजेच मे पर्यंत ही कामे पूर्ण होऊन जो शासनाचा पाणीटंचाई दूर करण्याचा उद्देश आहे तो पूर्ण होऊ शकतो असे सांगितले यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांनी आणि त्यांचाही आराखड्यापूर्वी कोणत्या उपाययोजना केल्या असा प्रश्न उपस्थित केला तसेच त्यांनी कागदावर फक्त आराखडे आखले जातात असा आरोपही केला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी सांगितले की खासदार नारायण राणे या भागाचे पालकमंत्री असताना हा जिल्हा टँकर मुक्त घोषित केला आहे तर जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते यांनी सार्वजनिक विहिरीचे पाणी या कालावधीमध्ये वापरण्यात यावे अशी सूचना केली.

तसेच या बैठकीमध्ये जन सुविधा योजना नागरी व ग्रामीण यांचा आढावा घेण्यात आला यामध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की किमान पाच कोटी दरवर्षी या योजनेमधून खर्च झाले पाहिजे असा आराखडा तयार करा प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत जा आणि विकासकामे घ्या असे सांगून गेल्या पाच वर्षांमध्ये पाणीटंचाईसाठी एकही रुपया खर्च केला गेला नाही आपला भाग पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी आराखडा वाढवा आणि पाणीटंचाई मुक्त गाव करा पुढील काळात हे चित्र दिसेल अशी आशा बाळगतो असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

कुडाळ तालुका पाणीटंचाई आढावा बैठकीत बोलताना आमदार निलेश राणे 

छाया प्रथमेश जाधव

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!