Thursday, July 30, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी गाव जोडणाऱ्या पुलाचे आमदार निलेश राणे यांच्या...

आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी गाव जोडणाऱ्या पुलाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असून अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते आणि मजबूत पूल हे अत्यंत आवश्यक घटक मानले जातात. या नव्या पुलामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीस निर्माण होणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होऊन गावांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. विकासाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल म्हणून या कामाकडे पाहिले जात आहे.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. पूजा इंगवले, जिल्हा परिषद सदस्य श्री. नागेश अहिर, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश कानडे, श्री. दीपक नारकर, श्री. तालुका प्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख श्री. अरविंद करलकर तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी पुलाच्या कामासाठी संबंधित विभागाचे अभिनंदन करत भविष्यातही ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देण्याचा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांनीही या लोकार्पण सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्व मान्यवरांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!