Wednesday, June 24, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळनेमकी माहीतीच समजत नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत असून प्रशासनाकडून सविस्तर माहीती...

नेमकी माहीतीच समजत नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत असून प्रशासनाकडून सविस्तर माहीती नागरिकांना देण्यात यावी : नगरसेवक विलास कुडाळकर

कुडाळ | प्रतिनिधी

शहर विकास आराखड्याबाबत लोकांच्या अनेक समस्या आहेत. नेमकी माहीतीच समजत नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत असून प्रशासनाकडून सविस्तर माहीती नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी प्रशासनाकडे केली. त्यावर लवकरच विशेष सभा बोलावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगीतले. याबाबत आतापर्यंत 86 तक्रारी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा बुधवारी नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका अक्षता खटावकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी व खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी नगरसेवक उदय मांजरेकर यांनी आपल्या प्रभागातील नळपाणी पाईपलाईन बदलण्याचे काम रखडले असून याला संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. सदर ठेकेदाराची अशी बरीच कामे अपूर्ण असून त्याच्यावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सदर ठेकेदार आमचे फोनही उचलत नसल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक विलास कुडाळकर यांनीही आमच्या प्रभागातील त्यांची कामे अपूर्ण असून, आमचेही फोन ठेकेदार उचलत नाही. आमदारांचेही फोन त्या ठेकेदाराने उचलले नसल्याचे त्यांनी सांगून कारवाईची मागणी केली. नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला तातडीने नोटीस बजावण्याच्या सूचना प्रशासनाला दिली.

सरकारी जागेत वृक्षलागवड केल्यानंतर त्यांची देखभाल व संवर्धन व्हायला हवे असे आफरीन करोल यांनी सूचित केले. रेल्वे स्टेशन नजिक साईदुर्गा येथे न.पं.च्या जागेत मीया वाकी पद्धतीचे उद्यान विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीबाबत चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!