Wednesday, June 24, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळजिल्ह्यातील विकास कामांना कुठेही निधी कमी पडणार नाही पालकमंत्री म्हणून नितेश राणे...

जिल्ह्यातील विकास कामांना कुठेही निधी कमी पडणार नाही पालकमंत्री म्हणून नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे काम कौतुकास्पद : खासदार नारायण राणे

कुडाळ | प्रतिनिधी 

जिल्ह्यातील विकास कामांना कुठेही निधी कमी पडणार नाही पालकमंत्री म्हणून नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे काम कौतुकास्पद आहे. असे खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी सांगितले. 

खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथील महायुतीच्या कार्यालयात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सोबत चर्चा केली जिल्ह्यातील तसेच मतदारसंघांमधील विकास कामांबाबत विचारणा केली यावेळी जिल्हा परिषद गटनेता दीपक नारकर यांनी नारूर येथे रोप ‘वे’ करावा अशी मागणी केली तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली माझी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी झाराप येथे खत उतरवण्यासाठी शेड ची मागणी केली तसेच नगरपंचायती साठी निधीची मागणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केली तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी विकास निधी मागणी पत्र दिले. 

यावेळी खासदार नारायण राणे यांनी सांगितले की, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे काम सभागृहामध्ये कौतुकास्पद आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यासाठी लागणारा निधी घेऊन येण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत या जिल्ह्याला निधी कमी पडू नये म्हणून सर्वजण आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळेच हा निधी मोठ्या प्रमाणावर येत आहे. असे सांगून तुम्ही दिलेली विकास कामे पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले. 

यावेळी सौ. नीलमताई राणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, भाजप महिला जिल्हाप्रमुख सौ. कोरगावकर, सौ संध्या तेरसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, सभापती मिलिंद नाईक, भाजप तालुकाप्रमुख संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक विलास कुडाळकर, उदय मांजरेकर, नगरसेविका सौ. नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, आफरीन करोल, अक्षता खटावकर, श्रेया गवंडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!