Friday, June 26, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे...

आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे कुडाळ भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आभार व्यक्त..

कुडाळ | प्रतिनिधी 

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिल्याबद्दल कुडाळ भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आभार व्यक्त केले आहे.

कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे सभागृहात सरकारकडे आग्रही मागणी करत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा शब्द सभागृहात दिला होता. त्यानुसार कार्यवाही करत १२ तासांच्या आत शासन निर्णय जाहीर करत प्रती हेक्टरी २२,५०० प्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांना एकूण ७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे, यात कुडाळ तालुक्यातील ७ हजार ७५१ शेतकऱ्यांना १२ कोटी ५७ लाख तर मालवण तालुक्यातील ७ हजार ४२९ शेतकऱ्यांना ११ कोटी २२ लक्ष एवढी नुकसानभरपाई मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त विमा कंपन्यांनाकडून नुकसानभरपाई मिळणे बाकी असून आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री श्री. नितेश राणे यांचा त्याबाबतही पाठपुरावा सुरु आहे.

 

कोकणातील बागायतदार, शेतकऱ्यांची समस्या आक्रमक शैलीत मांडली. त्यानंतर अवघ्या काही तासात शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली. २०१३ नंतरची अश्या प्रकारची ही पहिलीच नुकसानभरपाई आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली असून खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा व प्रयत्न यशस्वी ठरले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

 

मार्च एप्रिल मे २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून ३३४ कोटी ९८ लक्ष रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यात कोकण विभागातील आंबा आणि काजू नुकसानीसाठी २०९ कोटी १० लक्ष रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

  आमदार निलेश राणे नेहमीच सभागृहात अभ्यापूर्ण पद्धतीने कोकणातील विविध प्रश्न सातत्याने मांडत असतात व त्याचा पाठपुरावाही तेवढ्याच गतीने करून प्रश्न मार्गी लावतात. आम्हाला श्री. निलेश राणे यांच्यासारखा अभ्यासू व आक्रमक आमदार लाभला हे आमचं भाग्य आहे. त्यांच्या तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण मतदार संघ वेगळ्या उंचीवर जाईल याची खात्री आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!