Saturday, August 15, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकुडाळमध्ये ‘डीईआयसी सेंटर’मधून बालकांना विविध उपचार व मार्गदर्शन सुविधा*

कुडाळमध्ये ‘डीईआयसी सेंटर’मधून बालकांना विविध उपचार व मार्गदर्शन सुविधा*

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्र (DEIC) चे उद्घाटन

 

*सिंधुदुर्ग, दि. १५* :

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्र (DEIC) चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे जन्मापासून बालकांच्या विकासातील अडचणी, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब तसेच विविध आरोग्यविषयक समस्यांचे वेळेत निदान करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

या केंद्रामध्ये बालरोगतज्ज्ञांचा सल्ला, दंत तपासणी व उपचार, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, मानसोपचार व समुपदेशन, ऑक्युपेशनल थेरपी, श्रवणदोष तपासणी (ऑडिओलॉजी), दृष्टी तपासणी, विशेष शिक्षण मार्गदर्शन तसेच विकासातील विलंबाचे मूल्यांकन अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालकांच्या विकासातील समस्या लवकर ओळखून त्यावर आवश्यक त्या तज्ज्ञांकडून उपचार व पुनर्वसनात्मक सेवा देणे शक्य होणार आहे.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे केंद्र पालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बालकांच्या आरोग्यविषयक अडचणींचे लवकर निदान व वेळेवर हस्तक्षेप केल्यास त्यांच्या विकासाला योग्य दिशा मिळण्यास मदत होते. जिल्ह्यातील बालकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा त्यांच्या जवळच्या ठिकाणी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने डीईआयसी सेंटरची सुविधा महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!