पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या प्रयत्नाना यश ! – सभापती मिलिंद नाईक यांनी दीले आदेश
कुडाळ (प्रतिनिधी)
तब्बल अठरा वर्षे बंद असलेली कुडाळ ते वालावल माऊलीमंदीर हुमरमळा एस टी बस सेवा पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या प्रयत्नाने आज सुरू झाल्याने विद्यार्थी व प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले
कुडाळ ते हुमरमळा ही बस सेवा अठरा वर्षे झाली बंद आहे ती सुरु करण्यात यावी व हुमरमळा ते वालावल पर्यंत वाढलेली झाडी तोडण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी पंचायत समिती बैठकीत केल्या नुसार हुमरमळा ते वालावल पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडी तोडुन घेतल्याने आज कुडाळ आगाराचे अधिकारी तसेच सरपंच श्री अमृत देसाई, हुमरमळा ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या उपस्थितीत बस हुमरमळा पर्यंत आज आणुन केवळ अठरा वर्षाचा वनवास विद्यार्थी व प्रवासी यांचा संपला आहे
*सभापती मिलिंद नाईक यांचे आदेश *
कुडाळ पंचायत समिती सभेत पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी प्रश्न विचारताच सभापती मिलिंद नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक यांना सदर बस तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले यावेळी बबन प्रभु मळेकर, युवा सेना शाखा प्रमुख संदेश जाधव, लक्ष्मण खरात, दीलीप मार्गी, आदी उपस्थित होते


