Tuesday, July 28, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळवेताळ बांबर्डे-कदमवाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर 

वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर 

कुडाळ-वेताळ बांबर्डेमार्गे हिर्लोक-नारुर बसफेरी सुरू 

कोरोना काळापासून बसफेरी होती बंद 

 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ एसटी आगारातून सकाळी ९.३० वाजता सुटणारी कुडाळ-वेताळ बांबर्डेमार्गे हिर्लोक-नारुर ही बसफेरी कोरोना काळापासून बंद झाली होती. यामुळे वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथून हिर्लोक येथील विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. याबाबत वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी कुडाळ एसटी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांच्याकडे सदर एसटी फेरी सुरू करण्याविषयी अनेकदा पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून आजपासून कुडाळ-नारुर ही पुन्हा वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथील विद्यार्थी वर्गासाठी सेवेत दाखल झाली आहे.कदमवाडी, रांगणा तुळसुली या भागातून जवळपास ५० ते ६० विद्यार्थी येथून प्रवास करतात. ही बसफेरी सुरू केल्याने हिर्लोक विद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाचा वेळ वाचला आहे. 

     वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथे आज सकाळी १० वाजता पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांच्या मुख्य उपस्थितीत नारळ वाढवून बसफेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वेताळ बांबर्डे उपसरपंच शैलेश घाटकर, ग्रा. पं. सदस्य प्रदीप गावडे, ग्रा. पंचायत सदस्य दशरथ कदम, रामचंद्र मेजारी, मंगेश कलिंगण, सहदेव परब, बाळा कदम, चंद्रकांत कदम, अवधूत सामंत, वामन घाटकर, ग्रा. कर्मचारी बंटी मुळ्ये, दिलीप सावंत, तुषार सांडव, प्रसाद गावडे, शिवाजी कदम, ग्रामसेविका शालिनी कोकरे, संजय कदम, अमित कदम, एसटीचे निवृत कर्मचारी सुनील सामंत, एसटीचे वाहक-चालक आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!