Sunday, August 16, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळनमो शारदा संगीत क्लासेसतर्फे 'गुरुवंदना सोहळा' उत्साहात संपन्न; जि. प. सदस्य रुपेश...

नमो शारदा संगीत क्लासेसतर्फे ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहात संपन्न; जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन……

संगीतरत्न भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर बुवा संचलित “नमो शारदा संगीत क्लासेस” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना सोहळ्याला’ रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विशेष सोहळ्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलनाने अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रुपेश पावसकर म्हणाले, “गुरू-शिष्य परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीचा मुख्य पाया आहे. संगीतासारख्या पवित्र कलेच्या माध्यमातून बालकांवर आणि युवा पिढीवर उत्तम संस्कार रुजवण्याचे कौतुकास्पद कार्य नमो शारदा संगीत क्लासेस करत आहे. अशा उपक्रमांमुळे येत्या काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा संगीतमय भजनी रूपाने नटून निघेल यात शंका नाही.” या शब्दांत त्यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार श्री. रामचंद्र परब बुवा यांनी केले.

या सोहळ्याला व्यासपीठावर नेरूर जि. प. सदस्य रुपेश पावसकर, गुरुवर्य रामचंद्र परब बुवा, बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर, उपसरपंच दीपक सावंत, बिबवणे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजन मांजरेकर, धोंडू सातार्डेकर, अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार मंडळाचे मालक झीलू गोसावी यांच्यासह संजय सावंत, पांडुरंग सावंत-मांगले बुवा, मकरंद लालन, ललिता लालन, नितीन शेणई, बंड्या कोरगावकर, विश्राम कदम, विजय तावडे आणि सुभाष परब आदी मान्यवर उपस्थित होते.

या संगीत सोहळ्याला स्थानिक नागरिकांसह संगीतप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!