कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या एस. टी. स्मार्ट कार्ड शिबिराला शहरातील नागरिकांकडून उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये २०० रुपयांचे एस. टी. चे स्मार्ट कार्ड १५० रुपयाला देण्यात आले.
एसटी बस सेवेमध्ये प्रशासनाने स्मार्ट कार्ड आणले आहे यामुळे प्रवास करताना प्रवाशांना त्या स्मार्ट कार्ड द्वारे प्रवास करणे सुखकर होणार आहे हे स्मार्ट कार्ड कुडाळ शहरातील नागरिकांना मिळावे या हेतूने शहर शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयामध्ये स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन स्मार्ट कार्ड फ्रेंचाईसीचे प्रमुख पूजा पेडणेकर यांनी शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून केले होते. यावेळी बीएलए प्रमुख काका कुडाळकर, तालुका प्रमुख विनायक राणे, सभापती मिलिंद नाईक, शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, सौ रेवती राणे, राजवीर पाटिल, राकेश नेमळेकर, प्रथमेश केळबाईकर, प्रथमेश कांबळी आदी उपस्थित होते.


