Wednesday, July 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळनाईलाजाने राजीनामा देतेय - कुडाळच्या नगरसेविका संध्या तेरेसे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र

नाईलाजाने राजीनामा देतेय – कुडाळच्या नगरसेविका संध्या तेरेसे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र

कुडाळ:

कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरेसे यांनी नाईलाजाने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. दि. 21/07/2026 रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र सादर केले.मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभाराविरोधात 2/7/2026 रोजी मागणीपत्र दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने 10 जुलै रोजी 9 ते 6 उपोषण केले. त्यानंतरही उत्तर न मिळाल्याने 10 जुलै रोजी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या गैर कारभाराबाबत कारवाई करण्याची मागणीचे पत्र पुन्हा दिले. परंतु त्यावरही उत्तर मिळाले नाही, असा आरोप त्यांनी केला.

विशेष सभेत महत्त्वाच्या विषयावर ठराव मांडूनही मतदान घेतले जात नाही. मुख्याधिकारी सांगतात की ठराव मतदानासाठी घ्यायचा की नाही हा अधिकार फक्त सभाध्यक्षांचा आहे. त्यामुळे सभेत नगरसेवक कशाला हवेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नगरपंचायत प्रशासनाकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराला साथ देण्यासारखे होईल म्हणून मी राजीनामा देत आहे, असे पत्रात नमूद केले आहे. त्या प्रभाग 12 हिंदू कॉलनी कुडाळच्या नगरसेविका होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!