हातात तिरंगा घेऊन राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन; पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
कुडाळ | प्रतिनिधी
राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी कुडाळ तालुक्यात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता भैरव मंदिर येथून यात्रेला सुरुवात होऊन संत राऊळ महाराज कॉलेज येथे सांगता होणार आहे. या यात्रेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
याबाबत कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी संयोजक विवेक पंडित, शिवम महाडेश्वर, संध्या तेरसे, बंड्या सावंत, सुनील बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी विवेक पंडित यांनी सांगितले की, ही तिरंगा यात्रा कोणत्याही राजकीय पक्षाची नसून सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांची आहे. आयोजकांमध्ये राजकीय मंडळी असली तरी पक्षीय भेद बाजूला ठेवून सर्वांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान देखील मंचाच्या वतीने करण्यात येणार आहे. हातात तिरंगा घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत देशभक्तीच्या भावनेने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बंड्या सावंत यांनी केले.


