Sunday, August 16, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेत स्वांतंत्र्यदिनानिमित्त कवठे युवक मित्र...

कवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेत स्वांतंत्र्यदिनानिमित्त कवठे युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावस्कर यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप…

८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद कवठी शाळा नंबर १ या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ‘कवठी युवक मित्र मंडळ’ चे अध्यक्ष श्री. संजय करलकर आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या विशेष माध्यमातून व पुढाकारातून राबवण्यात आला.

व्यासपीठावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांनी संबोधित केले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण केले. तसेच तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षण व तंत्रज्ञानाची कास धरून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले.कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांनी कवठी युवक मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर उपस्थित कवठी युवक मित्रमंडळ अध्यक्ष श्री.संजय करलकर,लाजरी ग्रुप कुडाळ अध्यक्ष श्री.राजू पाटणकर, पंचायत समिती सदस्या सौ.अर्चना बंगे,सरपंच सौ.स्वाती करलकर,उपसरपंच श्री.रुपेश वाड्येकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मनिष वाड्येकर, उपाध्यक्ष सौ.जोशी मॅडम, सामाजिक कार्यकर्ते श्री.मंगेश बांदेकर,आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!