कुडाळ | प्रतिनिधी
आतापर्यंत आमदार वैभव नाईक यांनी जनतेची फसवणूक करून दिशाभूल केली आहे असा आरोप भाजप मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत करून येत्या निवडणुकीमध्ये आमदार वैभव नाईक यांचा ४० हजार मताधिक्याने पराभव करणार असल्याचे सांगितले.
कुडाळ भाजप कार्यालय येथे कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हा चिटणीस विनायक राणे, रुपेश कानडे, श्रीपाद तवटे, सुनील बांदेकर, बाळा पावसकर उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, कुडाळ व मालवण तालुक्यामध्ये खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे तीस कोटी एवढा निधी विविध योजनेतून मंजूर झाला आहे त्याबद्दल सर्व नेत्यांचे आम्ही आभारी आहोत असे सांगून हा निधी भाजपच्या नेत्यांच्या शिफारशीने मंजूर झाला असताना या ठिकाणचे आमदार वैभव नाईक हे दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्र पाठवून मंजूर झालेल्या कामांचा पाठपुरावा करावा असे सांगत आहेत मुळात आमदार वैभव नाईक यांनी एकही काम मंजूर केलेले नाही गावांमध्ये अशा प्रकारची पत्र देऊन संभ्रम निर्माण करणे आणि या कामांचे श्रेय घेणे हे काम त्यांनी सुरू केले आहे.
भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी या दोन्ही तालुक्यांमध्ये विकास कामांचा जो धडाका लावला आहे तसेच प्रत्येक गावा गावामध्ये जाऊन संपर्क वाढवला आहे याची धास्ती आमदार वैभव नाईक यांनी घेतली आहे त्यामुळे त्यांचा तोल ढासला आहे त्यामुळे ते सैरभैर होऊन लोकांना फसवण्याचा धंदा सुरू केला आहे. आता जनतेला आमदार वैभव नाईक यांचा खरा चेहरा समजलेला आहे त्यामुळे त्यांच्या भुलथापांना ही जनता बळी पडणार नाही असेही संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले
४० हजार मताधिक्याने होणार पराभव
आमदार वैभव नाईक यांची फसवणूक करण्याची आणि काम न करण्याची पद्धत आणि दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची प्रवृत्ती जनतेला समजून चुकली आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव हा ४० हजार मताधिक्याने आम्ही कार्यकर्ते मिळून करणार आहोत. असे सांगून आमदार वैभव नाईक यांनी आता घाशा गुंडाळायला घेतला पाहिजे आणि या मतदारसंघात त्यांनी गुण्यागोविंदाने नांदावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
