आमदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली होती नवीन बसेसची मागणी
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ एसटी आगारात आणखी ५ नवीन बसेस दाखल होणार आहेत. पुणे-दापोडी येथील एसटी महामंडळाच्या कार्यशाळेतून या “राजमाता जिजाऊ” ३ बसेस (बीएस ६ मॉडेल) उद्या कुडाळ येथे दाखल होतील. तसेच आणखी दोन बसेस मंगळवारपर्यंत अशा एकूण ५ बसेस उपलब्ध होतील. त्यामुळे कुडाळ आगारातील एकूण नवीन बसेसची संख्या १५ होणार आहे.
लवकरच नवीन बसेसच्या लोकार्पणचा कार्यक्रम आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी दिली.
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ आगारास नवीन बसेस मिळण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार, आमदार निलेश राणे यांनी केलेल्या पाठपुरव्याला यश आले आहे.


