Friday, September 4, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळअखेर शिवसेना स्टाईलने दणका दिल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग 

अखेर शिवसेना स्टाईलने दणका दिल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग 

रेल्वे स्थानक रस्त्यावरील पुलावर तात्काळ रेलिंगचे काम सुरू

 

कुडाळ | प्रतिनिधी 

शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर उप अभियंता पिसाळ यांनी तात्काळ रेलिंगचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे आज (शुक्रवार ) रेलिंगचे साहित्य साईटवर दाखल झाले असून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने या धोकादायक पुलाला तात्काळ रेलिंग बसवण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पिसाळ यांना घेराव घालत जाब विचारला होता.

रेलिंगचे साहित्य आल्यानंतर शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वतः साईटवर जाऊन साहित्याची पाहणी केली व काम दर्जेदारच झाले पाहिजे अशा सक्त सूचना केल्या.

यावेळी गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, प्रथमेश केळबाईकर, अभियंता ईश्वर बामणे, राजाराम गडेकर, संदेश सावंत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!