“माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानाच्या कामकाजाचा आढावा घेण्या करिता राज्यस्तरावरून राज्य समन्वय अधिकारी श्री. अमोल पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर,परुळे, ग्रामपंचायत परुळे येथे भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत परुळे *सन्माननीय सरपंच श्रीम. प्रणिती अंबडपालकर* यांची भेट घेऊन अभियानाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
तसेच कुडाळ पंचायत समिती येथे तालुक्यातील कर्मचाऱ्यांची आढावा सभा देखील घेतली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर मॅडम उपस्थित होत्या.
सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये भेट देऊन देखील तालुक्यातील माझे गाव आरोग्य संपन्न गाव कामकाजाचा आढाव घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर उपस्थित होते.


