Thursday, September 10, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हागणेशोत्सव काळातील नेटवर्क समस्यांसाठी बीएसएनएलची हेल्पलाईन सुरू*

गणेशोत्सव काळातील नेटवर्क समस्यांसाठी बीएसएनएलची हेल्पलाईन सुरू*

सिंधुदुर्गातील नागरिकांना नेटवर्क, कव्हरेजसह विविध तक्रारी नोंदविता येणार..

 

सिंधुदुर्ग, दि.10 : 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्कमध्ये येणारे अडथळे, कव्हरेजची समस्या तसेच इतर दूरसंचारविषयक अडचणी सोडविण्यासाठी बीएसएनएल सावंतवाडी कार्यालयाकडून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या तक्रारी तसेच नेटवर्कशी संबंधित समस्या थेट बीएसएनएलच्या निदर्शनास आणून देता याव्यात, यासाठी 02363-271006 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक तसेच पर्यटक दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत मोबाईल नेटवर्कवरील वाढता भार लक्षात घेता अनेक भागांमध्ये नेटवर्कची समस्या, कॉल ड्रॉप, इंटरनेटचा वेग कमी होणे, कव्हरेजमध्ये अडथळे यांसारख्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीने मदत मिळावी आणि त्यांच्या तक्रारी संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या नेटवर्कसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. विशेषतः गणपती उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांना मोबाईल सेवा सुरळीत मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या सूचनांची दखल घेत बीएसएनएल सावंतवाडी, सिंधुदुर्ग कार्यालयाने हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी नेटवर्क अथवा कव्हरेजची समस्या जाणवल्यास बीएसएनएल हेल्पलाईन क्रमांक 02363-271006 वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन बीएसएनएल सावंतवाडी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!