कुडाळ | प्रतिनिधी
कोणावरही टीका करण्यापेक्षा आपल्या कामाची रेष कशी मोठी करता येईल याकडे माझा प्रयत्न असतो असे आमदार निलेश राणे यांनी साळगाव येथील दोन गणेश घाटांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सांगितले यावेळी मोठ्या संख्येने साळगाव गावातील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यांचे स्वागतही आमदार निलेश राणे यांनी केले.
साळगाव येथे स्वखर्चातून बांधलेल्या दोन गणेश घाटांचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, रूपेश कानडे, सभापती मिलिंद नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनेश साळगावकर, मालवण उपनगराध्यक्ष पाटकर, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते यावेळी साळगाव गावातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ऋण आम्हा राणे कुटुंबीयांवर आहे या जिल्ह्याने खासदार नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेले पालकमंत्री नितेश राणे यांना मंत्रीपद आणि आता मला आमदारकी आपल्यामुळेच मिळाली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी काम करत राहणे हा आमचा उद्देश आहे कोणावरही टीका करत बसण्यापेक्षा आपल्या कामाची रेष कशी वाढवता येईल याकडे माझं लक्ष आहे असे त्यांनी सांगितले या मतदारसंघाची ओळख गेल्या दहा वर्षात पुसली गेली होती ती ओळख पुन्हा मिळवून देण्याचे कामे सभागृहात करत आहे आणि या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणावर निधी आणला जात आहे असे त्यांनी सांगितले.


