Sunday, September 27, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळपावसाच्या कमतरतेमुळे झालेल्या भात पीक नुकसानीची आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी

पावसाच्या कमतरतेमुळे झालेल्या भात पीक नुकसानीची आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी

आमदार निलेश राणे यांनी भात पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले

 

कुडाळ | प्रतिनिधी 

पावसाच्या कमतरतेमुळे झालेल्या भात पीक नुकसानीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी करून या भात पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी, कसाल, अणाव व पावशी बेलनदी येथे ही पाहणी करण्यात आली.

यावर्षी पावसाळा शेतीसाठी पूरक असा पडलेला नाही पावसाच्या कमतरतेमुळे भात शेती मोठे नुकसान झाले आहे पाणी नसल्यामुळे पीक शेतकऱ्यांना मिळालेले नाही या नुकसानी संदर्भात माहिती सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे आणि या नुकसान ग्रस्त भात शेतीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यामध्ये केली यावेळी महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाला भात पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा असे निर्देश दिले यामध्ये कुठेही कामचुकारपणा केला तर खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी बजावले आहे ही पाहणी रानबांबुळी, कसाल, अणाव, पावशी येथे केली. 

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रवीण हेर्लेकर, तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, सौ सुप्रिया वालावलकर, माजी पंचायत समिती सदस्य परशुराम परब, कसाल सरपंच राजन परब, युवा सेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके आदी उपस्थित होते.

 

फोटो भात पीक नुकसानीचे पाहणी करताना आमदार निलेश राणे सोबत अधिकारी व पदाधिकारी 

(छाया प्रथमेश जाधव)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!