Friday, October 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकचरा प्रश्नाचे राजकीय भांडवल कोणी करू नये - कुडाळ शिवसेना शहर प्रमुख...

कचरा प्रश्नाचे राजकीय भांडवल कोणी करू नये – कुडाळ शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे

शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ शहराचा कचरा प्रश्न आताचाच नाही पण वर्षभरापूर्वीच शिवसेनेची सत्ता आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्यामुळे कचरा प्रश्नाचे राजकीय भांडवल कोणी करू नये असे कुडाळ शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी विरोधकांना उत्तर देऊन शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

 

कुडाळ शहरांमध्ये कचरा डेपो संदर्भात जन आंदोलन करण्यासाठी जनतेला भडकविण्याचे काम सुरू आहे पण कचरा डेपोचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका कोणी घेत नाही. मुळात हा प्रश्न आताचाच नाही गेली अनेक वर्ष हा प्रश्न शहराला भेडसावत आहे. पण आमदार निलेश राणे जेव्हा आमदार झाले तेव्हा कचरा व्यवस्थापनाकडे प्रामुख्याने लक्ष दिला आणि वर्षभरापूर्वी शिवसेनेची सत्ता नगरपंचायतीवर स्थापन केल्यानंतर एमआयडीसी मध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा मिळवून देण्यापासून ते आता यंत्रसामुग्रीचे काम सुरू होईपर्यंत आमदार निलेश राणे यांनी लक्ष दिला आहे. 

कुडाळ शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. जे जन आंदोलनामध्ये सहभागी आहेत ते सुद्धा या शहरातील नागरिक आहेत त्यांनी हा प्रश्न कसा मार्गी लागेल याकडे बघावे कचरा डेपो बंद करून अडथळा निर्माण करू नये असे शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे. 

 

महाविकास आघाडीच्या काळात प्रश्न का मार्गी लागला नाही 

 

कुडाळ नगरपंचायतीवर पहिली तीन वर्ष महाविकास आघाडीची म्हणजेच उबाठा व काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळी त्यांचेच मंत्री, खासदार, आमदार हे उबाठाचे होते हा प्रश्न महाविकास आघाडीच्या काळात का सोडविण्यात आला नाही साधी एमआयडीसीमध्ये कचरा प्रकल्पासाठी जागा मिळवता आली नाही आता राजकीय भांडवल करून सहानुभूती मिळवण्याचे काम महाविकास आघाडी कडून केले जात आहे. पण येत्या दोन महिन्यापूर्वीच कुडाळ एमआयडीसी मधील कचरा प्रकल्प आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल असा विश्वास कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी प्रसिद्ध पत्रकार व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!