घावनळे गावात उबाठा शिवसेनेला भगदाड

0
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: a; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (200, -1); aec_lux: 247.04547; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये ७०० जणांचा प्रवेश 

कुडाळ | प्रतिनिधी

आपला मतदारसंघ हा विकासाचे एक मॉडेल असले पाहिजे आणि त्या ध्येयासाठी आपण काम केले पाहिजे आपलं काम बोललं पाहिजे टीकाकारांकडे लक्ष न देता आपलं काम केलं तर जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी घावनळे येथे पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी सांगितले. घावनळे येथील उबाठा शिवसेनेचे ग्रामपंचायत माजी उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली ७०० जणांनी प्रवेश केला घावनळे गावांमध्ये उबाठा शिवसेनेला भगदाड पाडले.

घावनळे ग्रामपंचायत येथील सभागृहामध्ये घावनाळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते असे मिळून ७०० ते ८०० जणांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, महिला मोर्चाच्या दीपलक्ष्मी पडते, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष आरती पाटील, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, आनंद शिरवलकर, मोहन सावंत, श्रीपाद तवटे, रुपेश कानडे, भाई बेळणेकर, दीपक नारकर, राजा धुरी आदी उपस्थित होते.

यावेळी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सांगितले की माजी उपसरपंच दिनेश वारंग यांची माझ्या सोबत जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी स्वतःसाठी काही न मागता गावाच्या विकासासाठी मागणी केली त्यांच्या केलेल्या मागण्या निश्चितच मी पूर्ण करेल गेल्या दहा वर्षात या ठिकाणच्या आमदार वैभव नाईक यांनी हा मतदार संघ ओसाड पाडला मुळात आपल्या मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन पाहिजे तर तो नेता विकास घडवू शकेल. टीका करणे यापेक्षा आपले काम बोलले पाहिजे असे सांगून पक्ष सोडताना काय वेदना होतात हे आम्हाला माहित आहे पण तुम्ही आता आमच्या कुटुंबात आला आहात तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही निश्चित करू आणि गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणू असे अभिवचन देतो असे सांगितले.

तर यावेळी माझी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी सांगितले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आबा मुंज यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारणात प्रवेश केला. गावाच्या विकासाची तळमळ होती म्हणून काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम केले. ग्रामपंचायत पूर्ण शिवसेनेची काढली पण या गावाचा हवा तसा विकास आमदार वैभव नाईक यांनी केला नाही फक्त आमच्या मतांवर डोळा ठेवून ते आमच्या सोबत राहिले पण विकासाचे काही ते बोलले नाही आणि विकास केलाही नाही त्यामुळे आम्हाला भाजपमध्ये प्रवेश करावा लागला माजी खासदार निलेश राणे हे कठोर दिसले तरी मनातून किती हवे आहेत हे मी त्यांना भेटल्यावर जाणीव झाली असे त्यांनी सांगितले.

घावनळे येथील उबाठा शिवसेनेला पडले भगदाड

घावनळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली विभाग संघटक प्रभाकर वारंग, सरपंच आरती वारंग, उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर, तंटामुक्त अध्यक्ष राजाराम पालव, माजी सरपंच राजश्री घावनळकर, ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा तावडे, रिया बागवेकर, दीपिका घाडीगावकर, मानसी बागवे, स्वरा धुरी, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पारकर, सोसायटी माजी चेअरमन जयराम सुद्रिक, सोसायटी सदस्य विटू कोकरे, सोसायटी सदस्य सुवर्णा वारंग, युवासेना उपविभाग प्रमुख निलेश धुरी, गाव अध्यक्ष राजेंद्र घावनळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निलेश गावडे, गाव संघटक नाना बोरगावकर, चंद्रकांत घाडीगावकर, रामा घाडीगावकर, युवा सेना पदाधिकारी संदीप पारकर, युवा सेना शाखाप्रमुख हेमंत पालव, सोशल मीडिया प्रतिनिधी प्रवीण कदम, युवा सेना पदाधिकारी ओंकार सावंत, उपशाखाप्रमुख पंढरी पारकर, शाखाप्रमुख लक्ष्मण राऊळ अशा ७०० ते ८०० शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश करून गावातील शिवसेनेला भगदाड पाडले.