सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायाचे झाले विसर्जन

0

सिंधुदुर्ग |  प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन भक्तांनी भक्तिमय वातावरणात केले गणपती बाप्पा मोरया…. मंगलमूर्ती मोरया…. पुढच्या वर्षी लवकर… या अशा घोषणा देत फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शनिवारी ७ सप्टेंबर रोजी गणरायाचे घरोघरी आगमन झाले भक्तांनी वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आज रविवार ८ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन तालुक्यातील नदी, ओहोळ, तलाव यांच्यामध्ये भक्तीमय वातावरणात गणरायाचा जयघोष करीत फटाक्यांच्या आतषबाजी ढोल पथकाच्या तालावर गणरायाचे विसर्जन केले.