Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्रमहायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणार 'काटे की टक्कर'

महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणार ‘काटे की टक्कर’

मुंबई | वृत्तसेवा

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा ओपनियन पोल आला असून या पोल नुसार महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रात दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. असे असतानाच आता एक ओपनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत तगडी फाईट होण्याची शक्यता आहे. विधानसभेत महायुतीला 137-152 अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 चा आकडा गरजेचा आहे. त्यामुळे ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार महायुती सहजरीत्या राज्यात पुन्हा सरकार बनवताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!