Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कोंकणभारतीय जनता पार्टी निलेश आखाडे पुरस्कृत ऑनलाईन गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

भारतीय जनता पार्टी निलेश आखाडे पुरस्कृत ऑनलाईन गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी | प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर श्री निलेश महादेव आखाडे आयटी जिल्हा संयोजक आयोजित ऑनलाइन गणेशोत्सव सजावट स्पर्धा रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक सहा साठी घेण्यात आली होती. या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून. साधारण 22 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

कोकणातील सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव निमित्त कोकणामध्ये मोठी धामधूम पाहायला मिळते. अनेक चाकरमानी आपापल्या गावी घरी गणेशोत्सव निमित्त येतात. आणि अतिशय आनंदाने उत्साहाने श्री गणेशासाठी सजावट करून गणेश मूर्ती स्थापन करतात. त्यांचा उत्साह अधिक वाढावा यासाठी आम्ही गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली होती असे निलेश आखाडे यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचेच अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. प्रत्येकानेच आपल्या बाप्पाच्या सजावटीसाठी खूप मेहनत घेतली आहे. यामध्ये क्रमांक काढत असताना कोणाला नंबर द्यावा हा प्रश्न देखील निर्माण झाला इतकी सुंदर सजावट प्रत्येकाने केली होती.

या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले आहे; नाचणे पॉवर हाऊस यश अपार्टमेंट येथील रहिवासी सचिनजी टेकाळे यांनी केलेल्या सजावटीला. यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील देखावा साकारलेला होता. अतिशय सुंदर अशी सजावट त्यांनी केली होती.

गजानन महाराज मंदिर पॉवर हाऊस शेजारील गौरिश अपार्टमेंट येथील रहिवासी श्रेयसजी अजित मयेकर यांनी स्वामी समर्थ रूपातील गणेश मूर्ती आणि वटवृक्ष साकारून अतिशय सुंदर असा देखावा तयार केला होता. या स्पर्धेमध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच विश्वनगर येथील ऍड. विजयजी पेडणेकर यांनी बाप्पासाठी केलेल्या सजावटीला या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी तीनही स्पर्धकांना. सन्मानचिन्ह आणि प्रथम क्रमांकास 3,333 द्वितीय क्रमांक प्राप्त सन्मानचिन्ह आणि 2,222 रोख पारितोषिक. तर तृतीय क्रमांक प्राप्त सन्मानचिन्ह आणि 1,111 रुपये पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्वांचे आभार आणि विजयी झालेल्यांचे स्पर्धकांचे अभिनंदन निलेश आखाडे यांनी केले आहे. सर्व विजयी झालेल्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!