कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले यावेळी त्यांनी गणरायासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला सुखी, समृद्ध कर असे मागणे केले.
मुंबई लालबाग मधील राजाचे दर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला जिल्ह्यामध्ये व्हावे यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली सन २०१० मध्ये सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षी १४ वर्ष असून सिंधुदुर्ग राजाच्या चरणी आज शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे नतमस्तक झाले गणरायाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासमवेत आनंद शिरवलकर, स्वरूप वाळके, अवधूत सामंत, प्रसन्ना गंगावणे, राम बांदेलकर, रोहित आटक, साई दळवी आदी उपस्थित होते यावेळी गणरायाचे चरणी माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील जनतेच्या सुख, समृद्धीसाठी मागणं केलं.
