सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे स्थलांतर करण्यास आम्ही देणार नाही ठाकरे सेना याला कडाडून विरोध करेल असा इशारा रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.
रत्नागिरी खेडशी येथील कट्टरशिवसैनिक मंगेश पेडणेकर यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील निवासस्थानी गणेश दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी रत्नागिरी येथील ब्रिटिशकालीन असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय कोल्हापूर येथे हलवण्याचा घाट घातला जात आहे याकडे राऊत यांचे लक्ष वेधले
आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे नव्याने होत असलेल्या ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ब्रिटिश काळातील सुमारे १५० वर्षांपूर्वीचे रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय उदगाव येथे हलविण्याची दाट शक्यता आहेरत्नागिरीतील शांत आणि रमणीय परिसरामुळे ब्रिटिशांनी १५० वर्षांपूर्वी बांधलेले प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. या रुग्णालयात एकूण १४४ मंजूर पदे आहेत. मात्र ५० टक्क्यांहून अधिक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. रुग्णांची संख्या अधिक असल्याने या रुग्णांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यालयीन पदे रिक्त आहेत. रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाला कमी कर्मचाऱ्यांकडूनच सध्या काम करून घ्यावे लागत असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, आता आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे कोल्हापुरातील जयसिंगपूर उदगाव येथे नव्याने होत असलेल्या ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रत्नागिरी येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र, दीडशे वर्षांपासून कोल्हापूर, सांगली. सातारा, सिंधुदुर्ग, गोवा आदी ठिकाणच्या रुग्णांसाठी असलेले हे प्रादेशिक मनोरुग्णालय आता रत्नागिरीतून काही वर्षांतच स्थलांतरित होणार आहे.
मात्र हे रुग्णालय रत्नागिरीतच ठेवण्याबाबत आपण लक्ष घालावे याकडे मंगेश पेडणेकर यांनी माजी खास. विनायक राऊत यांचे लक्ष वेधले. मात्र हे मनोरुग्णालय कोणत्याही परिस्थितीत आम्ही रत्नागिरीतून हलवायला देणार नाही प्रसंगी ठाकरे सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराच राऊत यांनी यावेळी दिला.
