Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळखासदार नारायण राणे व राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले सिंधुदुर्ग...

खासदार नारायण राणे व राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व सौ नीलमताई राणे यांनी घेतले यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सुखी समृद्धी आणि त्यांची भरभराट होऊ अशी मागणी गणरायासमोर खासदार नारायण राणे यांनी केली तसेच यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने खासदारकीच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने यश दिले त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ मधून भाजपचे नेते निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याचे यश प्राप्त करून दे असे गा-हाणे घालण्यात आले.

भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली या गणरायाचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व सौ नीलमताई राणे यांनी दर्शन घेतले यावेळी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा चिटणीस रणजीत देसाई, सरचिटणीस विनायक राणे, प्रदेश सदस्य सौ संध्या तेरसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, अशोक सावंत, श्री तांडेल, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती रुपेश राऊळ, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चा रुपेश कानडे, आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, भाजपा नगरपंचायत गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, शहर महिला मोर्चा अध्यक्ष मुक्ती परब तसेच चंदन कांबळी, सुनील बांदेकर, राकेश नेमळेकर, विनायक घाडी, पुजारी बापट, स्वरूप वाळके, साई दळवी, रोहित आटक आदी उपस्थित होते. यावेळी खासदार नारायण राणे यांनी आडेली येथील हिरकणी वारकरी महिला भजन मंडळाचे भजन पाहिले तसेच त्यांना बक्षीसही दिले.

 

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन

दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी नतमस्तक होऊन सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले तसेच खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समवेत आडेली येथील हिरकणी वारकरी महिला भजन मंडळाचे भजन पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!