रांगणा तुळसुली येथे ५२ हजार रूपयांची झाली चोरी

0

कुडाळ | प्रतिनिधी

गणेश चतुर्थीसाठी डिगस येथील मूळ गावी गेलेल्या उमेश आंगणे यांच्या रांगणातुळसुली येथील घराचा दरवाजा फोडून घरातील कपाटा मधील ५२ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डिगस येथील उमेश आंगणे यांनी तीन वर्षांपूर्वी रांगणा तुळसुली येथे घर बांधले मात्र दरवर्षी ते डिगस येथील मूळ गावी गणेश चतुर्थीला जातात ते यावर्षी सुद्धा गणेश चतुर्थीला डिगस येथे गेले होते १३ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून घरामधील कपाटामध्ये ठेवलेले ठेवलेली रोख रक्कम ५२ हजार रुपये चोरीला गेले या प्रकरणाचा तपास आवळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे मंगेश जाधव करीत आहेत.