वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ पपू कुबल यांचे निधन

0

वेंगुर्ले | प्रतिनिधी

वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि वेंगुर्ले कुबलवाडा येथील प्रसन्ना उर्फ पपू कुबल (वय ५५) यांचे आज (सोमवार) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रसन्ना कुबल यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी १० वर्षे नगरसेवक पद भूषविले होते.

त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळताच प्रसन्ना कुबल यांनी शहरासाठी जे काम केले आहे, त्याला शहराच्या इतिहासात तोड नाही. सन २०१४ साली राज्यात सत्ताबदल झाला. सेना – भाजप युतीचे सरकार आले. दीपक केसरकर पालकमंत्री झाले. आणि त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत प्रसन्ना कुबल यांनी शहरात विकासाची अक्षरशः गंगा आणली. आज वेंगुर्ला शहराची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया प्रकल्प यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात कौतुकाने केली जाते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. भाजपच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. स्नेहा कुबल यांचे ते पती होत. माजी नगराध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांचे ते दिर होत. आंबा बागायतदार नितीन कुबल यांचे बंधू होत.