पिंगुळी येथील सिद्धेश राऊळ यांचे झाले निधन

0

कुडाळ | प्रतिनिधी 

पिंगुळी राऊळवाडी येथील सिद्धेश एकनाथ राऊळ (वय ३९) या युवकाचे अल्पशा आजाराने निधन झाले प. पू. राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिर मधील असलेल्या हॉटेलमध्ये भाविकांना ते आत्मीयतेने चहा, लाडू देत असत. सतत हसतमुख असलेले सिद्धेश राऊळ यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राऊळ महाराज डेकोरेटरचे मालक महेश राऊळ यांचे बंधू होत.

प. पू. राऊळ महाराज यांच्या परिवारातील सिद्धेश राऊळ हा युवक सतत हसतमुख असायचा. काही दिवसांपूर्वी तो आजारी होता आणि या अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजया, विवाहित बहीण, भावोजी असा परिवार आहे.

सिद्धेश राऊळ हा दशावतार नाट्यप्रेमी होता. कुठेही दशावतार नाटक असेल येथे तो जाऊन पाहत असे. १६ सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस झाला आणि १७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. १८ सप्टेंबर रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले