मुंबई | वृत्तसेवा
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विद्यमान एकाही आमदाराचे तिकीट कापले जाणार नसल्याची हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत दिली
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये जागावाटपावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही अशी बैठकीत हमी देण्यात आली. २०१९ साली राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले होते. त्यात आणखी १५ जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे.
राज्यातील ७० पेक्षा जास्त जागांवर दावा
या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यातील ८० जागांवर दावा करण्याची तयारी होती. मात्र आमदारांसोबत झालेल्या बैठकीत फक्त १५ जागा वाढवून मागण्यांची रननीती आखण्यात आली आहे. त्यामुळे आता ७० पेक्षा जास्त जागांवर दावा करण्यात येणार आहे.
