बेपत्ता झालेल्या वालावल येथील श्रीकृष्ण पाटकर यांचा मृतदेह आढळला नदीपात्रात

0

निवती | प्रतिनिधी 

बेपत्ता झालेले वालावल धारवडवाडी येथील श्रीकृष्ण सदाशिव पाटकर (वय ५९) यांचा मृतदेह कर्ली नदीच्या पात्रातील मुहूर्त तळी या ठिकाणी आढळून आला याबाबत निवती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वालावल येथील श्रीकृष्ण पाटकर हे बेपत्ता झाले होते याबाबत सागर जगन्नाथ पाटकर यांनी निवती पोलीस ठाण्यात खबर दिली होती त्यांचा शोध घेतला असता ते सापडून आले नाहीत दरम्यान कर्ली नदीच्या पात्रात मुहूर्त तळे येथे त्यांचा मृतदेह आढळून आला या घटनेचा पंचनामा निवती पोलीस ठाण्याचे पोलीस सोन्सुरकर यांनी केला.