कुडाळच्या सौरभ गवंडे याचे लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत यश

0

कुडाळ | प्रतिनिधी 

भारतीय (युपीएससी) संघ लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कुडाळ शहरातील अभिनव नगर नं. २ मधील सौरभ संदीप गवंडे यांनी यश प्राप्त केले असून महाराष्ट्रात अव्वल येण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे या परीक्षेमध्ये सिंधुदुर्गाचे नाव त्यांनी उज्वल केले आहे त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कुडाळ येथील सौरभ गवंडे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे. सौरभ गवंडे याचे शिक्षण कुडाळ येथे पूर्ण झाले पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा पडतेवाडी या ठिकाणी झाल्यानंतर पाचवी ते बारावी पर्यंत कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे त्याचे शिक्षण पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी मुंबई येथील व्हिजेटीआय येथे बी-टेक सिव्हिल इंजिनियर हे शिक्षण पूर्ण केले हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला इंडियन ऑइल चंदिगड येथे ‘अ’ वर्ग अधिकारी या पदावर नोकरी लागली ही नोकरी करत असताना सौरभ गवंडे याने यूपीएससीच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तयारी केली आणि या परीक्षेमध्ये त्यांनी यश मिळविले त्याचे वडील कोकण रेल्वे सिग्नल इंजिनियर संदीप विश्वनाथ गवंडे हे आहेत तर आई सेवानिवृत्त पोस्टल असिस्टंट सुषमा संदीप गवंडे ही आहे सौरभ गवंडे हा सध्या चंदिगढ येथे कार्यरत आहे त्याने यूपीएससीच्या अभियांत्रिकी सेवा परिक्षेचा अभ्यास करताना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त क्लास लावला नाही कामावरून आल्यानंतर पुस्तके वाचणे तसेच ऑनलाइन अभ्यासक्रम जाणून त्या प्रकारे अभ्यास करणे अशा पद्धतीने त्याने यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षा दिली सौरभ गवंडे हा लहान असल्यापासून हुशार होता चौथी तसेच आठवी इयत्ता त्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तसेच तो प्रथम तीन क्रमांकामध्ये शाळेत येत असे आपल्या अभ्यासू वृत्तीने त्याने हे यश प्राप्त केले आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.