डोंगरी पोलीस ठाणे निर्भया पथकाने दाखविले प्रसंगावधान 

0

 

मुंबई | वृत्तसेवा

डोंगरी पोलीस ठाणे निर्भया पथक यांनी रस्त्यावर एक महिला अर्धवट प्रसूती अवस्थेत बघताच दाखवलेले प्रसंगावधान कौतुकास्पद असल्याचे बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी म्हटले असून या पथकाचे अभिनंदनही केले आहे.

डोंगरी पोलीस ठाणे निर्भया पथकाला गस्तीदरम्यान एक ४५ वर्षीय महिला पावसामध्ये अर्धवट प्रसूती परिस्थितीत चार नळ जंक्शन येथे दिसली. पथकाने तात्काळ आजूबाजूचे बॅनर व ताडपत्री गोळा करून महिलेस झाकले व दुसऱ्या एका महिलेच्या मदतीने प्रसूती केली.

सदर महिलेस जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने योग्य ती काळजी घेत माता व बालकास जे.जे. रुग्णालयात घेऊन गेले. सदर आई व बाळ दोघेही स्वस्थ असून महिलेच्या कुटुंबीयांना कळविण्यात आलेडोंगरी पोलीस ठाणे निर्भया पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी सर्व पथकाचे अभिनंदन करतो. असे बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी म्हटले आहे.