Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळजिल्हा रुग्णालय कुडाळमध्ये व्हावे कुडाळ विकास समितीची तहसीलदार यांच्याकडे मागणी

जिल्हा रुग्णालय कुडाळमध्ये व्हावे कुडाळ विकास समितीची तहसीलदार यांच्याकडे मागणी

कुडाळ | प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालय कुडाळ शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर आणण्यासाठी आज सोमवारी कुडाळ शहर विकास समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

विकास समितीच्या वतीने अभय शिरसाट, काका कुडाळकर, श्रीराम शिरसाट, प्रसाद शिरसाट, उमेश परब, तरबेज शेख, तौसिफ शेख, द्वारकानाथ घुर्ये, विद्याप्रसाद बांदेकर आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले की जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे.

त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांचे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग रेल्वे स्टेशन व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना मध्यवर्ती असे ठिकाण आहे. व अनेक खाजगी हॉस्पिटल कुडाळ येथे आहेत. इमर्जन्सी वेळेला खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टर सुविधा देऊ शकतात. यामुळे जिल्ह्यातील रुग्णाना कुडाळ शहरात जिल्हा रुग्णालय झाले तर फायदा होऊ शकतोकुडाळ ग्रामीण रुग्णालय इमारत जीर्ण झाली आहे. हि इमारत निर्लेखित होऊ शकते. कुडाळ ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी कार्यान्वित आहे. ही इमारत निर्लेखित करून प्रशस्त जिल्हा रुग्णालयाची इमारत होऊ शकते.तसेच जुना मुख्य कार्यकारी अधिकारी बंगला व ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची वसाहत ही जागा आरोग्य विभागाची आहे. येथे जिल्हा रुग्णालय डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वसाहत होऊ शकते.

या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा रुग्णालय कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे प्रशस्त इमारत होऊन कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आपल्या माध्यमातून शासनाकडे पाठवावा असे सांगितले याबाबत रविवारी सायंकाळी कुडाळ शहरवासी यांची बैठक झाली या बैठकीत ठरल्यानुसार आज सोमवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल्यानंतर यावर योग्य तोडगा निघाला नाही तर

३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे लाक्षणिक उपोषण व सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल. तरी आमच्या निवेदनाचा विचार न झाल्यास कुडाळ बंद व अन्य आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा विकास समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!