प्रथम क्रमांक शैलजा कांबळी
द्वितीय क्रमांक लक्ष्मण मालजी पवार
तृतीय क्रमांक गौरव नंदू किनळेकर
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरांमध्ये घेतलेल्या गणेश आरास सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेमध्ये लक्ष्मीवाडी येथील सौ. शैलजा प्रकाश कांबळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त होणार आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत गणेश आरास सजावट स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये १५ स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये प्रथम क्रमांक शैलजा कांबळी, द्वितीय क्रमांक लक्ष्मण मालजी पवार, तृतीय क्रमांक गौरव नंदू किनळेकर, उत्तेजनार्थ अरविंद शंकर मेस्त्री, सुबक गणेश मूर्ती राहुल नारायण मेस्त्री यांनी क्रमांक पटकावले आहे या स्पर्धेचे परीक्षण रजनीकांत कदम व गुरुनाथ कुडतरकर यांनी केले आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
