जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग बचाव समितीचा विरोध

0

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे असलेले जिल्हा रुग्णालय कुडाळ येथे स्थलांतर करण्यात येऊ नये त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग बचाव समितीने विरोध दर्शविला असून यासंदर्भात बुधवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस येथील श्री देव रवळनाथ सभागृह येथे सभा आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग बचाव समितीच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे सिंधुदुर्गनगरी येथे गेली ३० वर्ष जिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळतात तसेच जिल्हा रुग्णालय असल्याने त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेले आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एकत्र असणे गरजेचे आहे जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग हे काही कारणास्तव कुडाळ येथे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तरी त्याला विरोध असून यासंदर्भात पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी सभेला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग बचाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.