Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळभाऊबीज करून घरी परतणाऱ्या सौ. सायली आकेरकर यांचे अपघातात झाले निधन 

भाऊबीज करून घरी परतणाऱ्या सौ. सायली आकेरकर यांचे अपघातात झाले निधन 

कुडाळ | प्रतिनिधी

कोकण रेल्वेच्या माजी कमर्शियल क्लार्क आणि कुडाळ कविलकट्टा येथील रहिवासी सौ. सायली शरद आकेरकर, ( वय -६० ) यांचे रविवारी रात्री उशिरा कविलकट्टा येथून कुडाळ येथे जात असताना अपघात होऊन निधन झाले. सौ. आकेरकर या आपल्या कविलकट्टा येथील घरी गेल्या होत्या. घरी भाऊबीज कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा त्या मुलीसोबत दुचाकीवरून कुडाळ येथे राहत असलेल्या माठेवाडा येथील निवासस्थानी परत येत होत्या. मांजर आडवे आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन सौ आकेरकर या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपचार सुरू असता त्यांचे निधन झाले. अपघात रात्री पावणे बाराच्या सुमारास झाला. कोकण रेल्वेमध्ये त्या कमर्शियल क्लार्क म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी व त्यांचे पती शरद आकेरकर यांनी कुडाळ येथे व्यवसाय सुरू केला होता. रेल्वे कर्मचारी शरद आकेरकर यांच्या त्या पत्नी होत. सौ आकेरकर यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!