कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे ५० हजार मताधिक्याने निवडून येतील असे खासदार नारायण राणे यांनी सांगून जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत असा आशावाद व्यक्त केला ते कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
कुडाळ येथे महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम तसेच जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, रूपेश पावसकर, आर. के. सावंत संजय भोगटे, राजू राऊळ, जिल्हा बँकेचे संचालक निता राणे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले की तिन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत अशा प्रकारचे वातावरण आहे केंद्र व राज्य शासनाने म्हणण्यासाठी आणलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहे. असे सांगून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे ५० हजार मताधिक्याने निवडून येतील असे यांना यावेळी सांगितले.
