Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हामालवणबांदिवडे सरपंच तथा उबाठा उपतालुकाप्रमुख आशु मयेकर शिंदे शिवसेनेत ; आमदार वैभव...

बांदिवडे सरपंच तथा उबाठा उपतालुकाप्रमुख आशु मयेकर शिंदे शिवसेनेत ; आमदार वैभव नाईक यांना धक्का

महायुती नेते खा. नारायण राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थितीत प्रवेश 

मालवण | प्रतिनिधी 

मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे उबाठा सरपंच तथा ठाकरे युवासेना उपतालुकाप्रमुख आशु मयेकर यांसह माजी सदस्य लीलाधर मुणगेकर, येथील युवासेनेचे विकास आचरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गावात विकासकामांना प्राधान्य मिळण्यासाठी, महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांच्या माध्यमातून अधिक गतीने विकास होणार या विश्वासातून महायुती शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे सरपंच आशु मयेकर यांनी सांगितले. 

 यावेळी महायुती नेते खासदार नारायण राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख महेश राणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, बाबू परब, सचिन पाटकर, मंदार लुडबे, महेश पेडणेकर, ओंकार पेडणेकर, भाऊ मोरजे, राहुल परब यांसह अन्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!