Tuesday, June 23, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ*५ हजार रुपयाची लाच घेताना कुडाळ महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विजय जाधव...

*५ हजार रुपयाची लाच घेताना कुडाळ महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विजय जाधव यांना प्रतिबंधक विभागाने पकडले..*

सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी केली होती ५ हजार रुपयांची मागणी..

 

कुडाळ | प्रतिनिधी

 

सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी ५ हजार रुपये मागणी करणाऱ्या कुडाळ महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही रक्कम घेताना रंगेहात पकडले.

 

कुडाळ येथील तक्रारदार हे अल्पी पोलराईज्ड टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सोलारचे काम करतात यांनी बसवलेल्या सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता (वर्ग २) विजय जाधव यांनी ५ हजार रुपये मागितले होते. याबाबत ५ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली. होती या तक्रारीची प्रतिबंध विभागाने पडताळणी केली असता सापळा रचण्यात आला आज (मंगळवारी) या सापळ्यामध्ये महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विजय जाधव हे अडकले त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) चे कलम ७ प्रमाणे कुडाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज जिरगे यांच्यासह पोलीस हवालदार पालकर, पोलीस हवालदार रेवणकर, अजित खंडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!