Friday, May 8, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीसिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा होणार सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा होणार सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 

४३२ सरपंच पदांपैकी २१८ जागा महिलांसाठी होणार आरक्षित

जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत १५ जुलै रोजी

 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार १५ जुलै रोजी होणार आहे. ४३२ सरपंच पदापैकी २१८ जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. दोन महिन्यापूर्वी ही सोडत झाली होती मात्र आता पुन्हा नव्याने सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा करण्याचे शासनाने ठरविले आहे त्यानुसार १५ जुलै रोजी ४३२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ४३२ सरपंच पदासाठी असलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जातीच्या २९ जागांपैकी १५ जागा महिलांसाठी, अनुसूचित जमातीच्या ३ जागांपैकी २ महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या ११७ पैकी ५९ जागा महिलांसाठी तर सर्वसाधारण आरक्षणाच्या २८३ पैकी १४२ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत ही आरक्षणाची सोडत मंगळवार १५ जुलै रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!